तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

नेहरू युवा केंद्र वाशिम च्या वतिने पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग


फुलचंद भगत-वाशिम

स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ व संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था शेलुबाजार.
                     
११ मार्च रविवार रोजी स्थानिक शेलुबाजार येथील अंगणवाडी केंद्र येथे युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा नेहरू युवा केंद्र वाशिम व स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ व संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था शेलुबाजार च्या वतिने पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार चे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत महाकाळ सर , ए एन एम श्रीमती मेश्राम मैडम, आरोग्य सेवक दिलीप धंदरे ,आशा स्वयंसेविका योगिता डोके, अंगनवाडी सेविका रुबीना खान, अंगणवाडी मदतनिस अरुणा डोफेकर , हया होत्या . या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक अजय गोपाल परसे यांनी केले होते. यावेळी अजय परसे यांनी सांगितले की आपल्या ० ते ५ वर्षा पर्यंत बाळाला दोन थेंब पोलिओ चे पाजून त्यांचे पुढील आयुष्य हे सक्षम व्हावे म्हणुन दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी पोलिओला परत येण्याची संधी देऊ नका. आपल्या बाळाला पोलिओचा डोस दया जेणेकरून त्याचे पोलिओपासून संपूर्ण रक्षण होईल. पोलिओ रविवार पोलिओची मोहिम ५ वर्षा खालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची खात्री करा . प्रत्येकाने आपल्या बाळाला पोलिओ डोस पाजन्याचे आवाहन केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment