तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

डॉ.गोरक्षनाथ वाकळे लिखित 'प्राणितातीर्थ संतभूमी शिवपुरी' पुस्तकाचे नामदेव शास्रींच्या हस्ते प्रकाशन

शिऊर ता.वैजापूर

संत बहिणाबाई महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गोरक्षनाथ वाकळे लिखित तसेच शिऊरचे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव प्रकाशित 'प्रणिता तीर्थ संतभूमी शिवपुरी' या पुस्तकाचे संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे औचित्य साधून शिऊर येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते शनिवार (दि ३ मार्च) रोजी प्रकाशन करण्यात आले.

संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि विविध जाती धर्माच्या एकोप्याच्या उत्तम आदर्शाचे व शिऊर नगरीचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचे यथायोग्य सद्उदाहरणासह विश्लेषण प्रा.डॉ.गोरक्षनाथ वाकळे यांनी प्राणितातीर्थ संतभूमी शिवपुरी' या पुस्तकात केले आहे. नव्या पिढीला शिऊर गावातील वर्षानुवर्षे घडत आलेल्या घडामोडीचा मागोवा घेता यावा तसेच लहान थोरांना गावाची ऐतिहासिक महती कळावी, सामाजिक एकोप्याचा आदर्श इतरांना घेता यावा या दृष्टिकोनातून 'संतभूमी शिवपुरी' या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ.वाकळे यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या पुस्तकाची निर्मिती आणि प्रकाशनासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी मोठे योगदान दिले आहे. शनिवारी (दि ०३ मार्च) रोजी संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेल्या भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते व ह.भ.प.उत्तम महाराज मनेगावकर तसेच वारकरी महाराज मंडळींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सरपंच नितीन चुडीवाल, मुख्यमंत्री आरोग्य सहायता समितीचे राज्य सदस्य प्रमोद गुळे, निवृत्त गट शिक्षणाधिकारी बबनराव शिंदे, सारंगधर भोपळे, ज्ञानेश्वर मधाने, प्रा.ए.टी.चंदनशिवे आदी उपस्थित होते.

फोटो: संतभूमी शिवपुरी या पुस्तकाचे प्रकाशन नामदेव शास्त्री यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

No comments:

Post a Comment