तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

सौ.अरुणा शर्मा याचा परभणी जिल्हा पोलीस दलाकडुन कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मानीत


अरुणा शर्मा

पालम :- परभणी जिल्ह्यातील पालम येथील महिलांच्या विविध प्रश्नी सकारात्मक व उत्तम प्रमारें कार्य करून योगदान देत असलेल्या सौ.अरुणा शांतीलाल शर्मा यांचा नुकताच परभणी येथे दिनांक 12 मार्च रोजी जिल्हा पोलीस मुख्याल्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने कर्तुत्ववान महिला म्हणून गौरव करण्यात आला.  जागतिक महिला दिना निमित्त परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कर्तृत्ववान महिला म्हणून सौ. अरुणा शर्मा पालम यांना परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांच्या हास्ते प्रमाण पत्र देऊन  सन्मानित करण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे, प्रा. इंद्रजित भालेराव, एड. फिरदोस ताई, वाशीम येथील उषाताई आडागळे, संगिता जामगे, हर्षनताई, सुर्यवंशी, ए.पी.आय कलटवाड, सायबर क्राईम विभागाच्या ए.पी.आय शानबे ताई  सह मान्यवर  उपस्थित होते. या सन्माना मुळे पालम तालुक्यातुन सौ.अरुणा शर्मा यांचे अभिनंदन होत आहे.

1 comment: