तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

ट्विटर मोर्चाच्या माध्यमातून हजारो संगणक परिचालकांनी शासना समोर केला “आक्रोश”

“डिजिटल महाराष्ट्रात पहिलाच ट्विटर मोर्चा”

मुंबई येथील ०५ मार्चचा अधिवेशनावरिल मोर्चा होणार निर्णायक – सिद्धेश्वर मुंडे

मुंबई(प्रतिनिधी)डिजिटल इंडिया व डिजिटल महाराष्ट्राचे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांना मागील ८ महिन्या पासून मानधन नाही,शेतकरी कर्जमाफीसह गावातील सर्व प्रकारचे ऑनलाईन काम करणाऱ्या संगणक परिचालकांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून होळी च्या मुहूर्तावर पहिल्याचा ट्विटर मोर्चा ०१ मार्च रोजी सकाळी ०७ ते संध्याकाळी ०७ या १२ तासात आयोजित केला होता त्यात राज्यातील हजारो संगणक परिचालकानी सहभाग घेऊन शासनाच्या धोरणावर टीका करत अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
      झुटा है डिजिटल इंडिया का नारा,भुखा है संगणक परिचालक हमारा,असे म्हणत आणि हेच का अच्छे दिन,हेच का आपले सरकार  व ट्विटर मोर्चा हा हेश टेग वापरून राज्यातील हजारो संगणक परिचालकानी csc spv या कंपनीच्या भ्रष्टाचारासह अनेक मुद्यावर ट्विटर मोर्चाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडून आक्रोश व्यक्त केला,सकाळी ०७ पासून सुरु झालेला मोर्चा संध्यकाळी ०७ वाजता संपला यावेळी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,ग्रामविकासमंत्री मा पंकजा मुंडे यांना प्रत्येक ट्विट टेग करून गेल्या ८ महिन्या पासून मानधन नसताना डिजिटल महाराष्ट्र कसा करायचा?संगणक परिचालक बेरोजगार होत असताना शासन गप्प का?मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी २ वर्षा पासून दिलेले आश्वासनाचा शासनाला विसर का पडला?संगणक परिचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून असल्यामुळे संगणक परिचालकाना ८ -८ महिने मानधन मिळत नाही त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून मानधनाची तरतूद करावी ,संग्राम प्रकल्पातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात सामाऊन घेणे सह इत्तर मागण्यासाठी येत्या ०५ तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर निर्णायक मोर्चा होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्द्धेश्वर मुंडे यांनी दिली.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment