तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

गेवराई तालुक्यातील रेवकी येथील स्मशान भूमीचा प्रश्न लागला मार्गी

सुभाष मुळे...
-------------------
गेवराई, दि. 12 __ तालुक्यातील रेवकी या जिल्हा परिषद गट असलेल्या गावात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे, पावसाळ्यात तर अंत्यविधी करावा कसा..? असा प्रश्न निर्माण होताना दिसून येत होता. स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र होते. दरम्यान रेवकी येथील स्मशानभूमीसाठी पाच लाखाचा निधी मंजूर झाला असून यामुळे रेवकी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
         गेवराई तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या गावात स्मशानभूमीच नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती खुपच भयान असते. त्यामुळे येथील नागरिकांमधून स्मशान भूमीसाठीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दरम्यान रेवकी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांनी जिल्हाधिकारी तसेच जि.प.अध्यक्ष यांच्याकडे करुन संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. दरम्यान रेवकी येथे स्मशानभूमीस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असून त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. स्मशानभूमीस मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
       रेवकी सह गटातील देवकी, बागपिंपळगाव, लुखामसला, कोल्हेर, कटचिंचोली, हिंगणगाव, गोंदी, संगम जळगाव, वडगांव ढोक, गोविंदवाडी, मन्यारवाडी, पांढरवाडी, आगरनांदुर, सावळेश्वर आदी 20 गावांचा समावेश आहे. यामध्ये बहुतांश गावे ही गोदावरी नदी काठी वसलेली आहेत. त्यामुळे प्रामुख्याने या गावात कुणाचे निधन झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रेवकी येथील स्मशानभूमीला मंजुरी मिळाली असून आता गाव तेथे स्मशानभूमी करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सविता मस्के यांनी सांगितले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment