तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भारिपचे जिल्हाधिकारी यांना निवेदन


फुलचंद भगत-वाशिम
 जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ; कारवाई ची मागणी
शिष्यवृत्तीधारक भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज, विद्यापीठातील ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करावी,शिष्यवृत्ती भष्ट्राचारा प्रकरणी चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित अटक करावे.या मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजांनी यांच्या नेतृत्वाखाली दि.१५ मार्च रोजी जिल्हाधिकारी,वाशिम यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, २०१७-२०१८ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असताना महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्तीधारक भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज, विद्यापीठातील ७५ टक्के उपस्थितीची अट लागू केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीअभावी संस्थाचालक त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास नकार देण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातून राज्यातील लाखो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.या वरून असे निदर्शनात येत आहे कि शिष्यवृत्तीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती भष्ट्राचारा प्रकरणी चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित अटक करावे. एस.सी. प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा २ लाखापासून ५ लाखापर्यंत वाढवावी.ओ.बी.सी.एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा १ लाखांपासून ५ लाखांपर्यन्त वाढवावी. ईबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा ८ लाखांपासून १० लाखांपर्यन्त वाढवावी.निर्वाह भत्ता सरसकट दरमहा रु. १५०० वाढ करावी. टाटा सामाजिक संशोधन संस्था (TISS ) मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्वरत सुरु करण्यात यावी .ग्रामीण भागातील पालकांची गरिबी, दुर्गम गावे, प्रवास व्यवस्था अशा अनेक गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेजातील उपस्थिती ५० टक्क्यांच्या खालीच असते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष संपत आले असताना घालण्यात आलेली ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात यावी, तसेच भीमा कोरेगाव येथील विजयी क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या बहुजन समाजबांधवांवर १ जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला होता. या घटनेमागील मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यावरही त्यांना आता पर्यंत
अटक करण्यात आलेली नाही त्यांना त्वरित अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment