तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

बनवस भागातील कापूस पिक कापणी प्रयोगाच्या आहवाल चौकशी करा

अरुणा शर्मा

पालम :- बनवस मंडळातील डोगरगांव येथील कापूस या पिकाचा कापणी प्रयोग प्रत्यक्ष  न करता पूर्णपणे बोगस करुन अहवाल क्रषी विभागास सादर केल्यामुळे  बनवस मंडळातील तिस गावातील कापूस उत्पादक शेतकरी पिकविमा व बोंडआळी अनुदानापासुन वंचित राहिले आहेत. त्या करीता मा.जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर साहेब यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व तिस गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा व बोंडआळीचे अनुदान मिळवून देण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करताना परमेश्वर जाधव, चंद्रकांत जाधव, प्रभाकर  जाधव, अनिल अलापुरे, विश्वनाथ पडिले, जानकिराम गुट्टे, मारोतराव गुट्टे, संतूक गुट्टे, बाबुराव गुट्टे व पंचायत समिती सदस्य बालाजी वाघमारे आदिंनी निवेदन दिले.

No comments:

Post a Comment