तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

आमचं गाव आमचा विकास च्या माध्यमातून गावाचा विकास शक्य!


फुलचंद भगत
वाशीम. .येथून जवळच असलेल्या खंडाळा खुर्द येथे आमच गाव आमचा विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामराम हरी   सावके होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रविण प्रशिक्षक राजकुमार पडघान. व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच पार्वतीबाई मोकळे. सदस्य ज्ञानबा वंजारी. तातेराव वंजारी. जोती सावके. जोती वंजारी अदिची उपस्थिती होती. सुरूवातीला उपस्थितीतांनी छत्रपती शिवाजीराजे महाराज. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण केले.नंतर प्रमुख मार्गदर्शक प्रविण प्रशिक्षक राजकुमार पडघान यांनी आपल्या भाषणात सांगितले की शासनाने ठरवून दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधावयाचा आहे .त्यानुसार कृती विकास आराखडय़ाची निर्मिती केली आहे. त्यानियोजनातून गावकऱ्यांनी गावाचा विकास साधावा .असे राजकुमार पडघान यांनी आपल्या आमच गाव आमचा विकास कार्यक्रमाच्या कार्यशाळेत मार्गदर्शनकेले. आणि कृती विकास आराखडय़ाची माहिती देताना सांगितले की गावाचा विकास हा गावकऱ्यांच्या हातात असून गावाची मिळकत देखील विकासासाठी उपयोगातआणता येत. नंतर कृती विकास आराखडय़ाचे उपस्थितासमोर वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ज्ञानबा वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक सुमित्रा वानखेडे यांनी केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment