तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण नवोपक्रम स्पर्धा व नवोपक्रम बँक साठी आपले नवोपक्रम ऑनलाईन अपलोड करणे बाबत...


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि ०२
सन 2017-18या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येत आहे.सदर स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता हे पर्यवेक्षीय अधिकारी तसेच डी एल एड विद्यालयातील अध्यापकाचार्य हेही सहभागी होऊ शकतात.
  यामध्ये:
१)प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
२)माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
३)अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी

अशा तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
प्रस्तुत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

http://www.maa.ac.in/innovation2018

या लिंक वर टच करून स्पर्धकांनी आपले नवोपक्रम प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत.

सुचना :
१)सदर लिंक भरण्यापूर्वी सोबतचे पत्रक अवश्य वाचावे.
२)सदर लिंक ही ४मार्च २०१८पर्यंतच भरता येईल याची नोंद घ्यावी.

2 comments:

  1. sir/madam ya nanter navopkram spardhesathi amhala apan nehmi guidence karal hi apeksha
    navopkramababat amhala suchit karave hi vinanti

    ReplyDelete