तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

मुलींनी संरक्षण करण्याचे शिका, प्रत्येक गोष्टीला हिम्मतीने सामोरे जा...


सौ. मालताई रोकडे

अरुणा शर्मा

पालम :- शहरातील महात्मा गांधी विद्यालयात जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारया स्त्रियांचा सत्कार व महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंगलाताई गणेशराव रोकडे जि.प. सदस्य परभणी हया होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पालमच्या नगर सेविका सौ. मालताताई गजानन रोकडे, डॉ.शेळके मँडम, डॉ.कदम मँडम, अभिरुची मँडम, डॉ.बिडवई मँडम, महिला दक्षता समितीच्या अरुणा शर्मा, महिला पोलीस दिपिका चांदमारे, रेखाताई कदम, जयश्री रोकडे, गंगाताई माने, पंचफुला डुकरे, पदेवाड मँडम, रेणुका शिनगारे व्यसपिठावर उपस्थित होत्या. आधुनिक शिक्षणाची जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व सर्वे मान्यवर महिला चा सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवर महिलानी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसगी नगर सेविका मालताताई रोकडे यांनी शाळेतील मुलीना उदेशून सांगीतले की संरक्षण करण्याचे शिका, प्रत्येक गोष्ठीला हिम्मतीने सामोरे जा फक्त आजचा दिन हा महिला दिन नसुन प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे. त्यामुळे न घाबरता आपला ठसा राणी लक्ष्मीबाई सारखा इतिहास घडवा स्वता: ची क्षमता ओळखुन अबला न रहाता सबला व्हावे असे प्रतिपादन यावेळी केले. तसेच जि.प.सदस्य मंगलाताई रोकडे म्हणाल्या कि गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंत महिलाराज आहे.नगर सेविका पासुन देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला विराजमान होतात तर देखिल महिला आज स्वतत्र नाहीत. हा एक संशोधनाची बाजू आहे. ती तुम्ही सोडु शक्तात त्या साठी चिकाटीणे अभ्यास करा अशे बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हानवते मँडम व कदम मँडम यांनी केले. तर प्रास्ताविक ए.आर. पुंडगे यांनी केले. हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मुख्याद्यापक व्हि.एस. पवार, शाळेतील शिक्षक, सर्वे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment