तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

जिंतुरात न्यायालय परिसरात शेतकऱ्यांन विष घेतले उपचारा पूर्वी च झाले निधन

जिंतुर
जिंतुर ता मधिल साठ वर्षीय वृद्ध शेतकरी तुकाराम किशनराव चव्हाण  रा आसेगाव यांनी आज अचानक पणे जिंतुर न्यायालय परिसरात विष प्राशन करुंन कोसळले  ही घटना घड़ताच जवळच असलेले पोलिस कर्मचारी यानी त्यास ताबड़तोब जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व प्राथमिक उपचार करुंन 108 क्रमांक रुग्नवाहिके द्वारे परभणित हलवले पण वाटेतच सदर शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली
मात्र या गभीर प्रकरणाची रुग्णालयात हजर डॉक्टर मंडळी,कर्मचारी परिचारिका यांनी पत्रकाराना पण माहिती दिली नाही
या बाबत न्यायालय परिसरात अशी चर्चा होती कि सदर शेतकऱ्यांची न्यायालीन प्रकरणात नेहमी तारीख वाढत होती आज ची तारीख असल्याने चव्हाण न्यायालयात आले
नेहमी च्या तारिख पर तारिख मुळे हताश होऊन हे पाऊल उचलले असे कळाले आहे या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत

No comments:

Post a Comment