तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

घाटकोपर मधील पारशीवाडीत महाराष्ट्र युवा संघाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि २ “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”
हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…
महाराष्ट्राच्या कडे कपारीत ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त महाराष्ट्र युवा संघाच्या वतीने ३ ते ४ मार्च दरम्यान घाटकोपर येथे भव्य शिवजयंती चे आयोजन करण्यात आले आहे .पारशीवाडीतील जय महाराष्ट्र गणेश मैदान येथे सर्व कार्यक्रम पार पडतील
३ मार्च रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येईल .त्यानंतर ४ मार्च रोजी सकाळपासूनच विविध कार्यक्रमाची रेलचेल असेल .शिवजन्म सोहळा , शिव अभिषेक सोहळा , श्री सत्यनारायणाची पूजा , मंगळागौर, हळदी कुंकू , सभारंभ यानिम्मीताने पार पडतील.घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यकंट भा.पाटील इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.विनोद अनंत मेस्त्री शिव व्याख्यान सादर करतील .
छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.
या शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीत मध्ये बहूसंख्येने सामील व्हा असे आव्हान महाराष्ट्र युवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment