तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत

सेलु जितूंर विधानसभा प्रमुख तथा जि प गट नेते राम पाटील यांचा पुढाकार

प्रदिप कोकडवार
जिंतूर
तालुक्यातील कौसडी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरीच विष प्राशन करून  आत्महत्या केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली होती याची तत्काळ दखल घेत शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष तथा जि प गटनेते राम पाटील यांनी त्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना रोख 10 हजाराची आर्थिक मदत 11मार्च रोजी केली आहे.
या बाबत अधिक माहिती तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी मंचक गंगाधर लेंगुळे वय 45 वर्ष या शेतकऱ्याला जेमतेम  जमीन आहे यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते यातच बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज घेतलेले होते म्हणून संसाराचा गाडा कसा चालवायचा व बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवनचनेत त्यांनी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली होती म्हणून या घटनेची माहिती मिळतात राम पाटील यांनी तत्काळ कुटुंबाचा घरी जाऊन सांत्वन केले व रोख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली त्यांनी सामाजीक बांधिलकी जपली आहे यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख भारत पवार, माणिकराव बहिरट,राजेभाऊ लेंगुळे,ज्ञानदेव घनवटे, उमाजी हरकळ, किशनराव दंडवते,नारायण बहिरट,विठ्ठलराव जाधव,अतुल डख,रामा डख आदीजण उपस्थीत होते मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी दोन विवाहीत मुली,दोन मुले असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment