तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

सातारा येथे पहिल्या आणि अत्याधुनिक मेगा फूड पार्कचे आज उदघाटन


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २
सातारा येथे पहिल्या आणि अत्याधुनिक मेगा फूड पार्कचे आज उदघाटन केले 66 एकरमध्ये हा मेगा फूड पार्क राहणार असून, त्यात 200 कोटी रूपयांची गुंतवणूक असेल. वर्षाला 1 लाख मेट्रीक टन अन्नधान्यावर प्रक्रिया या पार्कमध्ये होईल. या माध्यमातून 5000 रोजगारसंधी निर्माण होणार असून, 23 हजारावर शेतकर्यांना त्यातून लाभ मिळणार आहेत. या पार्कला 24 तास एक्सप्रेस फीडरने वीजपुरवठा केला जाईल.
शेतमालाच्या किंमती अचानक कोसळण्यामुळे शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागते, या फूडपार्कमुळे शेतकर्यांची या समस्येतून मुक्ती होईल. शेतमालाला चांगला भाव तर मिळेलच, शिवाय मध्यस्थाची यंत्रणा संपुष्टात येईल. या प्रयत्नांमुळे संपूर्णपणे नवी अर्थव्यवस्था आपण विकसित करू शकू, असे उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले 
महाराष्ट्रात सर्वाधिक 54 शीतगृहे मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी पाठ पुरवा केला शीतगृहांना कमीत कमी दरात वीजपुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, सौर उर्जेसाठी सुद्धा काम करते आहे. शेतीला शाश्वत करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल. शेतकर्यांपर्यंत नवनवे संशोधन पोहोचले पाहिजे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये महाराष्ट्राचा पुढाकार आणि भूमिका सदैव अग्रणीच असेल.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री श्री हरसिमरत कौर बादलजी, श्री शरद पवारजी आणि खासदार, आमदारांची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment