तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

गर्भसंस्कार करन्यासाठी शिवचरित्राचा अधार घ्या -: वैजनाथ सोळंके

प्रा.डा.संतोष रणखांब तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी / सोनपेठ :

गर्भसंस्कार करन्यासाठी महिलांनी शिवचरित्राचा अधार घेत आपल्या गर्भातील बाळावर प्रेरणादायी संस्कार करावेत जेनेकरून हेच बाळ भविष्यात घरासह,समाजाचे व राष्ट्राचे नाव आपल्या कर्तृत्वाने मोठे करेल असे प्रतिपादन वक्ते वैजनाथ सोळंके यांनी केले.
तालुक्यातील मौजे विटा खु.येथे शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करन्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणुन परळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके बोलत होते.
शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो.एखादा उद्योग यशस्वीपणे सुरू करन्याच्या आगोदर सुध्दा शिवचरित्र वाचुन शिवाजी महाराजांचे उद्योगाबाबत आसलेले धोरण समजवुन घेतले तर उद्योगात यश मिळाल्याशिवाय राहत नाही.असेही सोळंके यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपने तर प्रमुख उपस्थितीमध्ये कु.आकांक्षा नवले पाटील,रंगनाथ रोडे,माजी उपसभापती मदनराव भोसले,रामेश्वर मोकाशे,जनार्धन झिरप,भगवान पायघन,जगन्नाथ कोलते यांच्यासह ईतरही मान्यवर होते.
यावेळी कु.आकांक्षा नवले पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिवचरित्राचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गवळी यांनी व सुत्रसंचलन दिलीप कोलते यांनी तर आभार आण्णासाहेब नाईकवाडे यांनी मानले.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांसह गावातील महिला, पुरूष व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरूणांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment