तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

भोन येथील पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत मृतक लाभार्थीच्या वारसांना लाभ द्या


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील भोन येथे पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत गोकुळाबाई शालीग्राम अडाळे यांच्या नावे घर मंजुर झाले होते यांचा १६ जुलै २०१७ रोजी मृत्यु झाल्याने मृतकाचा व नातलग नातु यांचे जाईन्ट खाते असल्याने मृतकाच्या वारसांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी एका निवेदना व्दारे शिवाजी अडाळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे
याबाबत निवेदना असे नमुद आहे कि तालुक्यातील भोन येथील गोकुलाबाई अडाळे यांच्या नावे पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले व घरकुलाचा पहिला हप्ता धनादेश मिळाला गोकुलाबाई व शिवाजी अडाळे आजी नातु यांचे स्टेट बॅक शाखा संग्रामपुरात संयुकत खाते असुन मृतकाचा मुत्युप्रमाण पत्र आधार कार्ड संबंधीत बॅकेत व गटविकास अधिकारी यांच्या कडे केलेल्या अर्जा सोबत झेराक्स प्रति जोडल्या आहेत वारस शिवाजी नामदेव अडाळे हे असल्याने व दोघाचे संयुकत खाते असल्याने वारस शिवाजी अडाळे यांच्या सही निशी घरकुलाचा पहिला हपत्याचे पैसे मिळाले मयत व्यकति लाभार्थी यांचे वारस असलेल्या व्यकतिला घरकुल लाभा देऊन उर्वरीत घरकुलाचे थकित हप्ते पैसे देण्याची मागनी निवेदनातुन शिवाजी अडाळे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment