तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

अहो, आश्चर्यच; 'किपिंग' फीसच्या नावाखाली बँकेकडून चक्क लूट..!

सुभाष मुळे....
---------------------
गेवराई, दि. 15 __ प्रत्येक व्यवसायिक, संस्था तसेच नागरीकांचे करंट खाते हे नागरी व राष्ट्रीयकृत बॅंकांत आहेत. असलेल्या अशा खातेदारांकडून किपिंग म्हणजेच 'ठेव' अथवा इतर कारणाच्या नावाखाली बॅंकेने चक्क लूट चालवली असल्याचे उदाहरण अनेकांकडून व्यक्त होऊ लागले आहे.
         किपिंग संदर्भात काही उदाहरणे द्यावयाची झाल्यास शाळेच्या विद्यार्थी गणवेश अनुदानासाठी आलेले पैसे देखिल कपात करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून प्रत्येक शाळेचे sbi बँकेत चालू खाते आहेत. सध्या या खात्यावर विद्यार्थी अनुदान जमा झाले आहे. ते विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहे. परंतु अचानक sbi बॅँकेने प्रत्येक खात्यावरचे 649 रुपये कुठलीही पूर्व कल्पना न देता प्रत्येक व्यवसायिक, संस्था तसेच नागरीकांचे असे सरसकट कपात केले आहे. आता हे कपात झालेले पैसे खात्यावर जमा झाल्याशिवाय अनुदान देता येणार नाही. आणि बॅँक ते वापस करत नाही, मग आता हा भुर्दन्ड खातेदारांवर पडणार आहे, Sbi बँकेच्या या धोरणामुळे खातेदारांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कपात केलेली रक्कम खात्यावर परत करा अशी मागणी होत आहे. परंतु बँक व्यवस्थापन हे आमच्या हातात काहीही नाही अशी उत्तरे देताना निदर्शनास आले आहे. परिणामी सर्वच खातेदार व गोरगरीब विदयार्थ्यांसाठी आलेल्या अनुदानावर बँका या आयताच डल्ला मारतेय असंही दिसून येत आहे. तरीही गोरगरीब विद्यार्थ्यासाठी आलेले अनुदान बँकेने कपात करू नये अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष बाळराजे तळेकर यांनी केली आहे.
      यावेळी उपस्थित श्री मेघारे सर, खेत्रे सर, लोणकर सर, नरुटे सर, दुधाळ सर, कुडके सर, सुरेश सानप, भगवान फुंदे, भागवत खेडकर, माऊली राठोड, सगळे सर, फय्याज खान, अर्जुन सुतार, जग्गनाथ जाधव ,सचिन दाभाडे,काळुसिंग,खोले सर, शेळके सर, शिंदे सर, जोशी सर, सुळे सर, चादर सर, मस्के सर, प्रकाश खरात, ठाकरे सर, चव्हाण सर, बागलाने सर, कवठेकर सर, अजित मुळूक, कैलास पट्टे, सचिन घुमरे, गणेश सानप, गवळी सर आदी मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment