तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Tuesday, 13 March 2018

यालाच म्हणतात पंकजाताई...


अवघ्या पंधरा दिवसात गारपिटीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना सरकारकडुन आणली, आणि अनुदान वाटपाचा इतिहास घडवला

अंबाजोगाई -जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्या नेतृत्वात कामाची धमक आणि आपल्या माणसाविषयी तळमळ असल्यानंतर कशा प्रकारे प्रश्न मार्गी लागतात?याचं एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे.पंधरा दिवसापुर्वी बीड जिल्ह्यातील दोन-चार तालुके गारपिटीच्या तडाख्यात सापडले.शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली.करोडो रूपयांचे नुकसान झाले.मात्र या नैसर्गिक संकटाची गंभीर दखल त्याचवेळी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडेंनी घेतली.जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनाम्याच्या सुचना दिल्या आणि अवघ्या बारा तासांत जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या होत्या.त्याचाच एक परिणाम म्हणुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम 4 कोटी 7लाख मिळाली असुन त्याचे वाटपही सुरू झाले आहे. याला पालकमंत्री पंकजाताई मुंडेंचं नेतृत्व म्हणतात.एक महिला नेतृत्व किती खंबीर अाणि खमक्या आहे?अशा प्रकारे तात्काळ मदत यापुर्वी कधीच कुणाला आणता आली नाही.
अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारं नेतृत्व स्व.गोपीनाथराव मुंडे यांचं होतं.तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन बीड जिल्ह्यातील अठरापगड जातीजमातीचं नेतृत्व करणाऱ्या ना.पंकजाताई मुंडेंनी विकासाचा नवा विक्रम जिल्ह्यात प्रस्थापित केला.तसंच गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवावर नैसर्गिक संकट ओढावल्यानंतर सरकारची मदत मिळवुन देण्यासाठी किती प्रयत्नाच्या पराकाष्ठा करतात?याचे हे उदाहरण आहे. फेब्रुवारी महिन्यात गारपिटीने माजलगाव, वडवणी, गेवराई,बीड तालुके झोडपुन काढले.शेतकऱ्यांचं करोडो रूपयांचं नुकसान झालं.मात्र मदतीचा हात म्हणुन अवघ्या काही क्षणात प्रशासन यंत्रणा पालकमंत्र्यांनी हलवली.पंचनामे सुरू झाले.एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई बारा तासांत शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पाहणी करायला आल्या होत्या.अर्थात आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे हे नेतृत्व किती खंबीरपणे उभा राहतं?याचं हे उत्तम उदाहरण आहे.विरोधक कितीही ओरडत असोत?मात्र बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणुस अठरापगड जातीधर्माचा माणुस पंकजाताईच्या कामावर आजही समाधानी आहे.कारण हा जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जात आहे तर दुसरीकडे सरकारचं अनुदान मिळवुन देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले अनुदान.मग ते विम्यापोटी असो किंवा नैसर्गिक नुकसानीचे असो.दुष्काळातही करोडो रूपयांचे अनुदान मिळाले.पंधरा दिवसापुर्वी गारपिट झाली आणि लगेच नुकसानभरपाईपोटी बीड जिल्ह्याला 4 कोटी 7 लाख रूपये मिळाले. एवढ्या लवकर नैसर्गिक संकटात सरकारकडुन अनुदानाची मिळणारी मदत हे तर बीड जिल्ह्यात इतिहास घडवणारंच आहे.कारण वर्षे वर्षे यापुर्वी अनुदान प्राप्त झाले नाही.मात्र पंकजाताई हे एक असं नेतृत्व ज्या नेतृत्वात इच्छा शक्ती आणि काम्ां करण्याची धमक आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे बीड जिल्ह्यात सरकारचे अनुदान लवकर मिळत आहे.यासाठी गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा पालकमंत्र्यांनी सतर्क ठेवली होती.एक महिला नेतृत्व त्यांना गोरगरीबांच्या सुखदु:खाची किती जाणिव असते?जिल्ह्यात अनेक पालकमंत्री होवुन गेले.मात्र अशा प्रकारे मदतीचा हात घेवुन जिल्ह्यातील लोकांना सुख दु:खात दिलासा देणारा हा एकमेव पालकमंत्री ज्याचं नाव पंकजाताई.

No comments:

Post a Comment