तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

पत्रकार कुंडलिक लहाने सिरसाळा भूषण पुरस्काराने सन्मानित

नितेश काळे

*सिरसाळा प्रतिनिधी:*
पत्रकार कुंडलिक लहाने सिरसाळा भूषण पुरस्कार ,यांना  सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार देता वेळेस
टी पी मुंडे. लक्ष्मण पोळ , बाबासाहेब काळे,व्यंकटेश शिंदे, यशराज इग्लिश स्कूल चे जनक उबाळे,डाॅ. प्रफुल्ल ललवाणी, यांच्या हस्ते हा पुस्कार देण्यात आला
येथील जनकल्याण बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा भावी संस्था वाघाळा संचालित श्री छत्रपती संभाजी मुकबधिर विद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तीना सिरसाळा भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. ह्या वर्षीचा 2018 चा सिरसाळा भूषण पुरस्कार पत्रकार कुंडलिक लहाने. यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

गेल्या आणि वर्षांपासून सिरसाळा सारख्या ग्रामीण भागात कुंडलिक लहाने. पत्रकारिता क्षेत्रात काम करतात. गावचे  समाजाचे प्रश्न आपल्या प्रखड लेखनीतून/ पत्रकारिते मधुन सोडवण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील राहिले. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यात ही पत्रकार कुंडलिक लहाने यांचे योगदान आहे. यांच्या कार्याची दखल घेत जनकल्याण बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा भावी संस्था वाघाळा सचिव जनक उबाळे यांनी दखल घेत यंदाचा 2018 चा सिरसाळा भूषण पुरस्कार देऊन पत्रकार कुंडलिक लहाने. यांना सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनिल जाधव (सर), वैशाली साईकर. यांनी केले.

No comments:

Post a Comment