तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

चाकूचा धाक दाखवून दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,चार जणांवर गुन्हा दाखल


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या वसमत येथील पॉवरलूम भागात विद्यार्थिनीस चाकूचा धाक दाखवून बळजबरी मोटारसायकलवर बसून नेऊन तिच्यावर अत्याचार (बलात्कार) केल्याप्रकरणी वसमत शहर पोलिस स्थानकात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दि १० मार्च रोजी दुपारी शहरातील पॉवरलुम भागात दहावीची परीक्षा देऊन घरी जात असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीस आरोपी अविनाश आंबटवार याने चाकूचा धाक दाखवून मोटार सायकलवर नेत शहरालगत असलेल्या दगडगाव मार्गावरील पुलाजवळ तिच्यावर अत्याचार केला सदर प्रकरणी दि १३ मार्च रोजी रात्री ९.७ वाजता शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अविनाश आंबटवार, आकाश आंबटवार,आशिष आंबटवार यासह चार जणांवर बलात्कारासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

अतिषय शांत व प्रगतशील वसमत शहरात मागील काही दिवसांपासून अपहरण बलात्कार,घरफोड्या,चोऱ्या
हाणामाऱ्या,एकमेँकावर प्राण घातक हल्ले, घरासमोरील दुचाकी जाळणे असे गंभीर स्वरूपाच्या गुन्हात झपाट्याने वाढ होत असल्याने वसमतची संवेदनशील शहराकडे वाटचाल होताना दिसत असल्याने वसमत वासियातून चिंता व्यक्त केली जात आहे या गंभीर बाबीकडे पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ? असा संतप्त प्रश्न वसमतकरातून विचारत या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी खुद्द वसमतकर प्रशासना विरुद्ध आंदोलनाच्या तयारीत असल्याचे ऐकवयास मिळत आहे.

 

No comments:

Post a Comment