तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

.पालम तहसिल कार्यलय येथे समाधान शिबीर संपन्न

शांतीलाल शर्मा

पालम :- तहसिल कार्यालयात महसूल मंङळ पालम चे  विस्तारीत समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविघ कार्यालयाचे तालुका विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. सदर शिबीरात त्या-त्या तालुका प्रमुखाने त्यांचे विभागाकडून घेण्यात येत असलेल्या विविध योजनांची महिती उपस्थितांना सांगीतली. सदर शिबीरामध्ये आरोग्य तपासणी, अंगणवाडी सेविकांनी तयार केलेले विविध पदार्थ, अंध व अपंगाचे शैक्षिणीक साहित्य व प्रशिक्षण, विविध विभागांनी उत्पन्न, रहिवाशी, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमेलर, भुमिहिन प्रमाणपत्र, शेतकऱ्यास ट्रॅक्टर वाटप, फुलशेती प्रमाणपत्र, फेरफार शैक्षणीक विभागां अंतर्गत लाभार्थीला धनादेशाचे वाटप करण्यांत आले. तसेच अमृपाली भगवान येवले जि.प.प्रा.शा.पारवा येथील मुलगी  दि.20/8/2017 रोजी पुरात वाहुन गेली होती. त्यांच्या पालकास विमा रक्कमेचा 1,00,000/- धनादेश वाटप करण्यात आला. सदर शिबीरास तहसिलदार सौ. तेजस्वीनी जाधव यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. या शिबीरास तालुका कृषि अधिकारी आबुलगेकर, गट विकास अधिकारी कोळी, गटशिक्षण अधिकारी, आरोग्य आधिकरी, बाल विकासअघिकारी, या सहअन्य कर्मचारी, नांगरीक, महिला अदिं मोठया संख्येत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment