तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यपदी राज जगतकर 

सुगंध कुट्टी बुध्दविहार जगतकर गल्लीत विविध कार्यक्रमाचे १४ एप्रिलला आयोजन 

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.11
डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्सव समिती जगतकर गल्लीच्या  अध्यक्षपदी राज जगतकर तर उपाध्यक्षपदी हर्षराज भुतावळे यांची निवड करण्यात आली.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती   शहरातील सुगंध कुट्टी बुध्दविहार जगतकर गल्लीत मोठ्या उत्साहात दि.१४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज रविवारी दि.11 मार्च रोजी एक व्यापक बैठक घेण्यात आली. मिलिंद  बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्सव समितीची कार्यकारणी निवडण्यात आली.  समितीच्या अध्यक्षपदी राज जगतकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्यकारणीत उपाध्यक्ष- हर्षराज भुतावळे, सचिव- रावसाहेब जगतकर,- कोषाध्यक्ष-अमोल आवचारे, संघटक- दशरथ जगतकर, सदस्य-जतिन जगतकर, सत्यापाल जगतकर, प्रेम जगतकर, परमेश्‍वर आवचारे, सुयोग आवचारे, निखिल कसबे, समाधान जगतकर, प्रकाश क्षीरसागर, सुनिल हानवते, तर सल्लागार प्रा.डॉ.विनोद जगतकर, रमेश गायकवाड, अशोक जगतकर,    दिपक जगतकर, राजाभाऊ जगतकर,रमेश जगतकर, प्रमोद जगतकर, संजय जगतकर, सुनिल आवचारे,प्रताप समिंदरसवळे, संघपाल समुद्रे,निलेश वाघमारे, प्रसिध्द प्रमुखपदी संपादक प्रा.बालाजी जगतकर यांचा समावेश आहे.  
     .या बैठकीस असंख्य भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन संघपाल समुद्रे, आभार प्रदर्शन ऍड.संजय जगतकर  यांनी केले. 
  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जगतकर गल्ली येथे  विविध कार्यक्रमाचये आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष राज जगतकर यांनी दिली.  

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment