मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Friday, 2 March 2018

परळी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात प्रतिकात्मक होळी

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.02

शेतकरी आत्महत्या, प्रचंड बेरोजगारी, भांडवल शाहांना कर्जाचे घबाड, महागाई, भ्रष्टाचार, जाती व धर्मवाद, निर्माण करणाऱ्या व जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या दळभद्री भाजप सरकार विरोधात परळी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक या ठिकाणी होळी पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी परळी पंचायत समितीचे सभापती मोहन दादा सोळंके, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नगरसेवक संजय फड, जमील अध्यक्ष, अजीज कच्ची, रा.कॉं. शहर सरचिटणीस अनंत इंगळे, अल्पसंख्याक अध्यक्ष नजीरभाई, अल्पसंख्याक यु.कॉ. अध्यक्ष गफार काकर, रा.यु.कॉ. शहराध्यक्ष सय्यद सिराज, शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, सुरेश नानवटे, उपाध्यक्ष नरेश सुरवसे अवधूत केंद्रे , सचिनदादा जोशी, कृष्णा डुबे, चंदू हालगे, रणजित सुगरे, ज्ञानेश्वर होळंबे, श्रीकांत माने, जयराम गोंडे, दिनेश कांबळे, शेरू पठाण, रा.वि.काँ तालुकाध्यक्ष जयदत्त नरवटे, शहराध्यक्ष अनंत ढोपरे, सरचिटणीस संकेत दहिवडे, कार्याध्यक्ष प्रतीक बद्दर, सतीश गंजेवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment