तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

कै.रामकृष्ण कांदे यांच्या गोडजेवणानिमित्त वाकडी येथे आज ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शीकरांचे किर्तन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे वाकडी येथे आज गुरुवार दि.15 मार्च रोजी ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे किर्तन होणार असून भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील वाकडी येथील लक्ष्मण कांदे, गोविंद कांदे यांनी यांचे वडिल माजी पंचायत समितीचे सदस्य कै.रामकृष्ण मानाजी कांदे  यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम । सकळ तिर्थाचीये धुरे । जिये का माता पितरे । तया सेविसी किर शरीरे । लोण किजे ।। मित्ती फाल्गुन वद्य 13 शके 1939 गुरुवार दि.15 मार्च 2018 रोजी होणार असून त्यानिमित्त दु.12 ते 2  वा. ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे किर्तन होणार असून दुपारी 2 ते 6 वा. भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.

वाकडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी पाटील बार्शीकर यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी वाकडी, ता.अंबाजोगाई येथे उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प ज्ञानोबा मानाजी कांदे, लक्ष्मण रामकृष्ण कांदे, गोविंद रामकृष्ण कांदे यांनी केले आहे. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment