तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

गरीब रुग्नासाठी शिवाभाऊ आणी अन्नांचा मदतीचा हात


फुलचंद भगत
वाशिम-
शिवा भाऊ सावके यांच्या रुग्नसेवा युवा गृपच्या माध्यमातुन गरजु आणी गरीब रुग्नांना तात्काळ मदतीचा हात देवुन अनेक रुग्नांचे जीव वाचवनारे या गृपचे युवक वाशिम जिल्ह्यातील रुग्नासाठी संजीवनी ठरत आहेत.सेवा हीच इश्वरसेवा या ऊक्तीनूसार गरजुंना ऊपचारासाठी मदत करुन हजारो गरजुंना ब्लड मोफत देवून जीव वाचवणारे युवकांनी मोठी फळी शिवाभाऊंच्या प्रेरणेचे तयार झाली आहे.शिवाभाऊ सावके यांचीच प्रेरणा घेवुन अन्ना पाटिल यांनीही रुग्नसेवेचा वसा घेतला आहे. अन्नांना रुग्ण सेवा गटाचे सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपल्या गटातील प्रत्येक सदस्य आप आपल्या परीने रुग्ण सेवा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे पाहून खूप आनंद त्यांना होत असल्याचे ते सांगतात.नाही तर या धावपळीचे जीवनात सर्वच पैशाचे मागे लागले असतांना,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणार्‍या धुरंधरांना व सर्व मिञ मंडळींना या कार्यासाठी लाख लाख प्रणाम करायला ते विसरले नाहीत.गरीब,गरजु रुग्नांना सेवा करण्याचं काम अन्ना गेली कित्येक वर्षापासुन करत आहेत.तसेच 2005 पासुन ते रुग्णांना उपचारासाठी मुंबई येथे नेऊन रुग्ण सेवा करण्याचं काम  करत आहेत. आजपर्यंत त्यांनी पस्तीस ते चाळीस रुग्णांना मुंबई येथे ऊपचारासाठी नेले आहे. मुंबईतील जे.जे.हासपिटल,के.एम.हॉस्पिटल,नायर हॉस्पिटल,बामंबे हॉस्पिटल,टाटा हॉस्पिटल,लीलावती हॉस्पिटल, ब्रिजकॅनडी हॉस्पिटल,वाडीया हॉस्पिटल,या सर्व हॉस्पिटल मध्ये  रुग्ण घेऊन गेले आहे. तेव्हा या सर्व हॉस्पिटल ची त्यांना भरपुर माहीती आहे. सर्व दुर्धर आजारावर शासकीय खर्चाने उपचार केले जातात. सर्व योजनांची माहिती सुध्दा आहे. रुग्नसेवा युवा या गृप च्या माध्यमातून  कुणालाही उपचारासाठी मुंबई येथे जायचे असेल तर अवश्य सांगा टिम सदैव आपल्या  सेवेत हजर आहे असे अन्नांनी आवाहण केले आहे. जर गरजू रुग्णाची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी भाग्यवान समजेल असे भावोद्गार त्यांनी काढले. मुंबईमध्ये विविध दुर्धर आजारावरील ऊपचाराची माहीती अन्नांना असल्यामुळे   याविषयी गरीब  रुग्नांना माहीती हवी असल्यास संपर्क करन्याचे आवाहनही केले आहे. धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था अतिशय वाजवी दरात सहज उपलब्ध करुन देतात तरी  गरजूंनी कळवा असे त्यांनी सांगीतले आहे, जेणेकरून योग्य ,उत्तम व चांगले उपचार आपल्या गरिब रुग्णांना मिळेल व यामधुन रुग्नांची सेवा करन्याची संधीही मिळेल.

गरीब,गरजु रुग्नांनी तथा कुणालाली,कुठेही ब्लडची आवश्यकता भासल्यास संपर्क करा....👇🏻

शिवाभाऊ सावके-9527951461

अन्नाभाऊ पाटिल-9922010460

------------------------------------------
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment