तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

ॲक्सिस बँक फाऊंडेशनच्या मदतीने आयोजित ‘पार्टनरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ या

विषयावर आयोजित वार्षिक परिषदचे आयोजन करण्यात आले होते
प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि १५ ॲक्सिस बँक फाऊंडेशनच्या मदतीने आयोजित ‘पार्टनरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावर आयोजित वार्षिक परिषदचे आयोजन करण्यात आले होते .ॲक्सिस बँक फाऊंडेशनने आजवर जीवनमान सुधारण्याचे विविध कार्यक्रम 1760 गावांतील 2 लाख कुटुंबापर्यंत पोहोचविले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने नव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी शाश्वत विकासाचे जे 17 ध्येय निश्चित केले आहे, ते प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि सांगितले की, भारत आणि महाराष्ट्र या अभियानात अतिशय सक्रिय योगदान देत आहे. राज्य सरकारने व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनच्या माध्यमातून कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या 1000 गावांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी अभियान हाती घेतले आहे.
विविध कार्पोरेट, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून हा कार्यक्रम राबविला जातो आहे. जलयुक्त शिवार अभियानाला मिळालेले अफाट यश हे असेच एक उदाहरण आहे. या अभियानाचे यश हे लोकसहभाग आणि त्यांनी भरभरून दिलेले योगदान यामुळेच आहे. येणार्‍या काळात रोजगार आणि उत्पन्नाच्या अधिकाधिक स्त्रोतांची निर्मिती यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. आज खाजगी क्षेत्र नाविन्यपूर्णता आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगाने काम करते आहे. अशा संस्थांनी सरकारसोबत काम केल्यास आणखी व्यापक संधी निर्माण होतील, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment