तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीवर डाॅ. अंजली निंबाळकर यांची निवड


सुभाष मुळे....
----------------------
खानापूर, दि. 13 __ राज्य बालभवनच्या अध्यक्षा आणि केपीसीसी सदस्या डाॅ. अंजली हेमंत निंबाळकर यांची एआयसीसीच्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे आदेश काल सायंकाळी जारी करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष श्री. राहूल गांधी यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून त्यांच्या संमतीने काॅंग्रेस पक्षाच्या सेंट्रल इलेक्शन थाॅरीटेचे अध्यक्ष श्री मुलापल्ली रामचंद्रन यांनी हे आदेश जारी केलेले आहेत.
       या निवडीबद्दल डाॅ. अंजलीताई बोलताना म्हणाल्या की, माझी ही निवड म्हणजे पक्षासाठी काम करणाऱ्या खानापूर तालुक्यातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान असल्याचे सांगून या निवडीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठी श्री. राहूल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष श्री. डाॅ. जी. परमेश्वर, श्री मल्लिकार्जुन खर्गे, श्री. सतीश जारकीहोळी, एआयसीसी सेक्रेटरी व बेळगाव जिल्हा पालकमंत्री श्री. रमेश जारकीहोळी यांचे विशेष आभार मानले. निवडणूकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या निवडीमुळे खानापूर तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले असून योग्य वेळी केलेली ही निवड हा खानापूरच्या राजकारणातील एक महत्वाचा संकेत असल्याचे बोलले जात आहे.
      बालभवन कर्नाटकच्या अध्यक्षपदाच्या रुपाने प्रथमच खानापूर तालुक्याला महामंडळांच्या यादीत प्रतिनिधीत्व मिळाले होते, आज त्याची पुनरावृत्ती होऊन इतिहासात प्रथमच खानापूर तालुक्याला एआयसीसीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्याबद्दल डाॅ. अंजलीताईंचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment