तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

पदवीधर वेतनश्रेणीसाठी शिक्षक भारती संघटना परतूूरच्या वतीने निवेदन

परतूर

आज शिक्षक भारती संघटना परतूूरच्या वतीने  राहूल लोणीकर जि.प.माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य यांना प्राथामिक पदवीधर शिक्षकांना देय असलेली वेतनश्रेणी ९३००- ३४८०० वेतन श्रेणी पुर्ववत बहाल करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .

  यापुर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी दिनाक २९जुन रोजी काढलेल्या आदेशाने जिल्हातील जवळपास एक हजार शिक्षकांना मिळालेली ग्रेड पे व वेतनश्रेणी काढून घेण्यात आली होती जिच्या विरोधात जिल्हातील २९९ शिक्षकांनी मा. उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे WP/_7388/2016 अन्वये आव्हान देण्यात आले होते .

   तेव्हा राहूल लोणीकर यांनी जिल्हा परिषदे मध्ये सदरील विषयाला वाचा फोडून जिल्हयातील पदवीधर शिक्षकांना न्याय दयावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे .

निवेदन देण्यासाठी तालूकाध्यक्ष आश्विन गुंजकर , सचिन सोनखेडकर , ज्ञानोबा लहाने ,परसराम मुजमूले , विशाल वायाळ , जमीर अहमद , मोहन गिरी , शुभाष मोरे यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment