तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

वंशाचा दिवा मानला जातो तिथे मुलीला वंशाची पणती का मानले जात नाही...शबाना शेख.

शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द

जागतिक महिला दिनानिमित्त लोणी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्त्या शबाना शेख यांना महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतिने जागतिक महीला दिनानिमित्त सन्मान पञ देतांना सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम मगर सचिव राधाकृष्ण सोनावणे तैय्यमुर सैय्यद आदि
महिला दिन म्हणजे काय?, महिला दिन का साजरा केला जातो? मग पुरुष दिन का साजरा केला जात नाही असा मोठा प्रश्नचिन्ह घेऊन काही प्रश्न मनात निर्माण होतात. आजचा दिवस म्हणजे तिच्या सन्मानाचा,तिच्या गौरवाचा, कारण "ती" अर्थात "स्त्री" या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात.

           संपूर्ण जगाला एक स्त्री कशी असावी? स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर काय करावे? याच सुंदर उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ, सुंदर आवाज असणारी गाणकोकिळा लता मंगेशकर,  स्वातंत्र्य भारताच्या निर्भीड पंतप्रधान इंदिरा गांधी, भारतीय पोलिस सेवा अधिकारी किरण बेदी आणि अंतराळात पोचलेली कल्पना चावला यांनी दिले आहे, तर एकीकडे आज  घडीला आपल्या देशात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भरभक्कमपणे कुठल्याही क्षेत्रात काम करत आहे मग ते डॉक्टर, इंजिनिअर, असो वा राजकीय आश्या स्त्रियांचे आपल्याकडे हजारो उदाहरणे आहे पण मग तरीही जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या जीवाला धार लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या भ्रुणाच्या हत्येबरोबर  मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते. या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती आज तिच्या वाट्याला आली आहे.घरातल्या नातेवाईकापासून गावच्या  गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करायला मागेपुढे पाहत नाही याची मात्र खंत वाटते. आज घडीला आपण मुलाला वंशाचा दिवा आणि मुलीला परक्याचे धन म्हणतो पण जिथे मुलाला वंशाचा दिवा मानला जातो तिथे मुलीला वंशाची पणती का मानले जात नाही.जर हि मुलगीच नसेल तर तुमचा हा वंशाचा दिवा काय कामाचा तुमची पुढील सक्षम पिढी घड्यावण्यासाठी ज्याप्रमाणे मुलगा हा वंशाचा दिवा आहे त्याप्रमाणे मुलगीही वंशाची पणती आहे.आणि या वंशाच्या पणतील आपण नीच वागणूक देऊ लागलो, तिच्या जन्म होण्याआधीच आपण तिला आपल्यातून नाहीस करू लागलो तर हे जग कस अस्तित्वत राहील असा  मोठा प्रश्न समाजापुढे उभा राहतो.
         आजच्या महागाईच्या व आधुनिकीकरणाच्या  २१ व्या शतकात नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रियांनी उंबरठा ओलांडला आहे आधुनिक समाजरचणनेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने काम करावे लागत आहे. नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने तिला चांगलेच हाल सोसावे लागत आहेत. आजही कित्येक कार्यालयांमध्ये स्त्रिया कामाला जातात.गृहोपयोगी साधने निर्माण झाली म्हणून स्त्रीला घरात जास्त काम नसते हे वक्तव्य म्हणजे तिच्यावर होणारा घोर अन्याय करणारे आहे. उलट या फावल्या वेळात गृहोपयोगी वस्तुंची खरेदी करणे,मुलांचे अभ्यास घेणे, त्यांना शाळेत पोचविणे व आणणे  घरचे हिशोब राखणे, यांसारखी वेळखाऊ कामे तिच्याकडे आपोआपच आलेली आहेत.त्यामुळे तिची आळपीट थांबलेली नाही. घरच्या पुरुष्यासह अन्य घटकांनी स्त्रीच्या बरोबरीने घरकामाची जबाबदारी उचलून तिला मदत करायला हवी. त्या दृष्टीने तिच्या व्यवसायात वा नोकरीत आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन तिला द्यायला हवे.सर्व बाबतीत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मोकळीक तिला दिल्यास खर्या अर्थाने समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल आसेल तेज न्यूजशी बोलताना शबाना शेख म्हणाल्या

No comments:

Post a Comment