तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

तीन तलाकच्या निषेधार्थ मुस्लिम महिलेचा पालम येथे मुक मोर्चाचे आयोजन

पालम :- पालम येथे दि.15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड महिलाचा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून तो मोर्चा पालम येथिल उर्दू शाळे पासून तहसील कार्यालयावर जानार आहे. हा मोर्चा तीन तलाक बिल पास वापस घेणे, व मुस्लिम महिलांना भारतीय संविधान पद्धतीने न्याय मिळणे याच्या विरोधात करण्यात येणार असून केंद्रातील शासनाने मुस्लीम महिलांच्या हिताच्या नावाखाली तीन तलाक पद्धती विरोधात लोकसभेत बिल पारीत केला आणि सध्या हा राज्यसभे मध्ये प्रलंबित आहे. या प्रस्तावित कायद्या विरोधात मुस्लीम महिलांचे आंदोलन होणार असून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या निर्देशानुसार देशभरात तीन तलाक पद्धती विरोधात होत असलेल्या कायद्याला विरोधात होत आहे आणि भारतभर या कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचे प्रचंड मोर्चा आणि धरणे आंदोलन होत आहे. या कायद्याबद्दल मुस्लिम महिला मध्ये रोष असून हा कायदा मुस्लिम महिलांना कदापी मान्य नाही. तीन तलाक पद्धतीच्या नावाखाली केंद्र सरकार शरीयत कायद्यात हस्तक्षेप करण्याचा कट करीत आहे. मुस्लिम महिलांचा या कायद्याला पाठीबा असल्याचा खोटा प्रचार केंद्र सरकार करीत आहे. उलट मुस्लिम महिलांचा या कायद्याला विरोध आहे. उलट वस्तु स्थिती अशी आहे की भारतात जवळपास 21 लाख महिला-पुरुष पासून विभक्त राहतात आणि त्यात मुस्लिम महिलांची संख्या फक्त 2 लाख असून त्या मध्ये केवल 54 हजार तीन तलाक चे प्रकरण आहे. केंद्र सरकारला त्या 20 लाख महिलांच्या हिताची काळजी नाही आणि जाणून बुजुन फक्त मुस्लीम महिलांच्या हिताच्या नावाखाली नवीन कायदा करू पाहत आहे. याला तीव्र विरोध असून हाच विरोध दर्शवण्यासाठी पालम तालुक्यातुन मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मूक मोर्चा नियोजन मौलाना मुदसीर सहाब कासमी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तालुका अध्यक्ष पालम, अकबरखाँ मुनवरखाँ पठाण,मौलाना रफीक बशीर खान, पठाण शाहनवाज खान मीरआलम खान, शेख जावेद शेख दस्तगीर, खुरेशी सादेख अब्दुल लतीफ यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment