तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

बासर ला आर्य वैश्य समाजाचा वधूवर परिचय मेळावा दिमाखात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी,शनिवार,रविवार रोजी भव्य दिव्य सोहळा

प्रदिप कोकडवार
जिंतुर
आर्य वैश्य समाज कुलगुरू भास्कराचार्य संस्थान वासवी माता ट्रस्ट श्री क्षेञ बासर तेलगंणा येथे शनिवार आणि रविवार असे  दोन दिवस आर्य वैश्य समाजाचा वधू वर परिचय मेळावा व सामुहिक विवाह सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी सर्व समाज बांधव व समिती प्रमुख एकवटले आहेत.हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.गेल्या दोन महिन्यांपासून समिती प्रमुख झंझावात दौरा करून निमञंण दिले आहे.मेळावा मार्गदर्शक एकनाथराव मामडे,मेळावा प्रमुख राजेश्वर उतरवार,रमेश माशेटीवार,राम बच्चेवार,जी.एल.निलावार,शशिकांत कोटलवार,औदूबंर बटेवार,विजय कुंचनवार,लक्ष्मण रेवणवार,उल्हास महाजन,राहूल अमिलकंठवार,संजय रूद्रवार,साईनाथ कामीनवार,दताञय चंबलवार,दता बंडावार,सुवेश पोकलवार,संदिप गादेवार,शाम उतरवार,नरेन्द्र येरावार आदीसह सर्व समितीचे प्रमुख प्रयत्न करित आहेत.शनिवारी सकाळी सहा वाजता माता कन्यका परमेश्वरी मातेचे पूजन,अकरा वाजता उदघाटन,स्मरणिकेचे प्रकाशन,आणि त्यानंतर वधू वर परिचय मेळावा सुरू होईल.रविवारी सकाळी दहा वाजता दिपप्रज्वलन करून पाहूण्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.वधू वर परिचयानंतर सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.याप्रसंगी निजामाबाद चे आमदार बीगाला गणेश गुप्ता,मुधोळचे आमदार विठ्ठल रेड्डी,चंद्रशेखर,आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार,भानुदास वट्टमवार, बी.एन.विलास,भास्कराचार्य महाराज,आदींची उपस्थिती राहणार आहे.या मेळाव्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील पंधरा ते वीस समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्या नुसार सर्व तयारी करण्यात आली आहे. परिचय मेळाव्यात दिड हजार वधू वरांनी नोंदणी करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.समाज हित डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा होत आहे असे मेळावा प्रमुख राजेश्वर उतरवार आणि जेष्ठ मार्गदर्शक एकनाथराव मामडे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment