तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

सेलूच्या मुशायऱ्यात इमरान प्रतापगढीची हजेरी

आ भांबळे कडून सेलूवाशीयांना शायरीची मेजवानी

जिंतूर - सेलू मतदारसंघातील आ. विजय भांबळे यांनी सेलू वाशीयांना शनिवार 17 मार्च रोजी आठवडी बाजारात सायंकाळी 6 वाजता कुलहिंद मुशायऱ्याचे आयोजन करून शायरीची मेजवानी दिली असून या मुशायऱ्यात तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आंतरराष्ट्रीय शायर इमरान प्रतापगढी हजेरी लावणार आहे. परिणामी या मुशायऱ्यासाठी संबंध मराठवाड्यातील शायरी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
                     शहर व परिसरामध्ये उर्दू साहित्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यासाठी तसेच उर्दू साहित्याची संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी आ. विजय भांबळे यांनी सेलू वाशीयांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रख्यात उर्दू कवींना आमंत्रित करून शहरातील आठवडी बाजारात कुलहिंद मुशायऱ्याचे आयोजन केले आहे. उर्दु भाषेतील मुशायऱ्यात संपूर्ण जगाचे आकर्षण ठरत असलेले तसेच तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आंतरराष्ट्रीय शायर इमरान प्रतापगढी हे या शायरीच्या मैफिलीत हजेरी लावणार असल्याने निश्चितच संबंध मराठवाड्यातील हजारोंच्या संख्येतील त्यांचे चाहते या मुशायऱ्यासाठी उपस्थित राहणार आहे. शिवाय राष्ट्रीय पातळीवर प्रख्यात उर्दु शायर संपत सरल, शकील जमाली, लता हया, डाॅ नुसरत महेंदी, अबरार कशीफ, काझी सुफयान, नईम फराज, मुश्ताख अहेमद हे ही मुशायऱ्याची मैफिल रंगावणार आहे. या कुलहिंद मुशायऱ्यास शहरासह तालुक्यातील साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment