तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

भारिप बहुजन महासंघ सिरसाळा व पिंपरी ( बु.) सर्कल ची बैठक संपन्न 


बैठकीत पदाधिका-यांच्या निवडी 

सिरसाळा प्रतिनिधी  : परळी तालुक्यातील सिरसाळा व पिंपरी बु. जिल्हा परिषद सर्कल मधील भारिप बहुजन महासंघाची बैठक संपन्न झाली. झालेल्या ह्या बैठकीत नविन प्रवेशित युवकांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  सिरसाळा सर्कल अध्यक्ष पदी युवराज किरवले, सिरसाळा युवा सर्कल अध्यक्ष म्हणून रवि  (दादा) काजळे, सिरसाळा शहर अध्यक्ष आकाश भैय्या गायकवाड, पिंपरी बु. सर्कल अध्यक्ष पदी अमोल चोपडे, पिंपरी बु. सर्कल युवा अध्यक्ष  देवीदास राजभोज, पिंपरी बु. सर्कल संघटक पदी बळीराम तुपसमुद्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  मा. प्रकाश आंबेडकर एक स्वभिमानी नेतृत्व आहेत व भारिप बहुजन महासंघ हा महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा स्वभिमानी पक्ष आहे. म्हणून आम्ही भारिप बहुजन महासंघा मध्ये प्रवेश केला असुन ह्या परिसरात भारिप चे संघटन मोठ्या ताकतीने वाढवणार आहोत असे मत नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.हि बैठक जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली,  बैठकीस परळी  तालुका अध्यक्ष परमेश्वर लांडगे, परळी शहर अध्यक्ष संजय गवळी, ता. सचिव साहेबा रोडे, युवा बीड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब किरवले, रंजीत वैराळ ( पिंपरी बु. )आकाश किरवले, अविनाश किरवले, नाना भारती कपिल किरवले, लखन गायकवाड आदीसह अनेक जण उपस्थित होते.
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment