तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 15 March 2018

परळी उपजिल्हा रूग्णालय येथे स्वच्छता मोहिम.


महेश सिनियर सिटिझन ग्रुप व न.प.चा संयुक्त उपक्रम

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.15
   परळी शहरातील उपजिल्हा रूग्णालय परिसरात महेश सिनियर सिटिझन ग्रुप व न.प.तर्फे स्वच्छता मोहिम  दि.14रोजी पासुन सुरू केली असुन दि.16रोजी तीचा समारोप मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

आरोग्याशी सबंधीत असलेल्या परळी शहरातील उपजिल्हा रूग्णालय हे गेल्या अनेक वर्षापासुन अस्वच्छतेच्या समस्येने ग्रासले होते न.प.तर्फे म्हणावी तशी साफ सफाई होत नसायची त्यातच या ठिकानी अनेक महाशय  मोठ्या लघुशंका करीत  असल्यामुळे हा परिसर दुर्गधंयुक्त झाला होता व त्याचा त्रास रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णानां,डाँक्टर,कर्मचारी व रूग्णाच्यां नातेवाईकांना  सहन करावा लागत होता हि बाब महेश सिनियर सिटिझन ग्रुपच्या लक्षात आल्यावर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील उपजिल्हा रूग्णालय येथे दि.14रोजी पासुन स्वच्छता मोहिम सुरू केली आहे .या मोहिमेस परळी न.प.च्या स्वच्छता विभागाचे सभापती तथा या वार्डाचे नगरसेवक विजय भोयटे यांनी नाल्यामधील अनेक वर्षा पासुनचा घट्ट होवुन बसलेला गाळ काढण्यासाठी मिनी जेसीबीची सोय उपलब्ध करून देवुन गाळ वाहून नेण्या साठी ट्रँक्टर व मजुर पुरविले .सदर स्वच्छता मोहिमेचा समारोप उद्या दि.16रोजी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करतांना महेश सिनियर सिटिजन ग्रुपचे अध्यक्ष पाडुरंग सोनी,सचिवओमप्रकाश भुतडा ,सह सचिव प्रा बैजुलाल भंडारी,उपाध्यक्षके.आर.बंग,गिरिधारी लाल मल्ल,जयप्रकाश काबरा,हनुमंत तोष्णिवाल,पांडुरंग मोदाणी,मुरलीधर सारडा,हरिप्रसाद सारडा,प्रा,शांतीलाल लाहोटी,व महेश सिनियर सिटिझन ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते या वेळी परळी विकास मंचचे अध्यक्ष प्रकाश सांमत यांनी उपजिल्हा रूगणालय येथे चालु असलेल्या स्वच्छता मोहिमेस भेट देवुन महेश सिनियर सिटिझन ग्रुप व न.प.चे स्वच्छता सभापती विजय भोयटे यांचे कौतुक केले .

स्वच्छता सभापतीनी जनतेला केले आवाहन.
राज्याचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ परळी,सुदंर परळी या उपक्रमाअंतर्गत न.प.ची स्वच्छता टिम शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकाराने काम करत आहे.जनतेनेही आपली जबाबदारी समजुन न.प.ला सहकार्य करावे असे विनम्र आवाहन स्वच्छता सभापती विजय भोयटे यांनी केले.
          

या उपजिल्हा रूग्णालय परिसरात व आजु बाजुस स्वच्छतालय नसुन नाईलाजाने लोकांना उघड्यावर लघुशंका करावी लागते व त्याचा त्रास रूग्णालयात येणाय्रा महिलांना सहन करावा लागतो त्यासाठी या भागात सुलभ स्वच्छतालयाची व्यवस्था न.प.करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता(मामा)लांडे यांनी केली आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment