तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

घनश्याम मापारी यांची प्रेरणा इतर पुढाऱ्यानी घ्यावी।

         तहसीलदार सुरडकर

रिसोड वार्ता महेंद्रकुमार महाजन

अवलिया संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात पाणी टंचाई ची भीषण समस्या असताना मोहजा ईगोले येथील तरुण सरपंच रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम मापारी यांनी सोतः च्या खर्चाने विहिरी वरून गावातील झोपडपट्टी पर्यंत पाईपलाईन करून संपूर्ण झोपडपट्टी तील गावकऱ्यांना विनामूल्य घरपोच नळ कनेक्शन करून दिले हे कार्य अत्यांत प्रेरणादायी आहे याचं आदर्श तालुक्यातील ईतर पुढाऱ्यांनी घेऊन समाज सेवा करावी असे विचार कार्यक्रम स उद्घाटक म्हणून तहसीलदार यांनी व्यक्त केले कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर तर प्रमुख उपस्थिती त सरपंच घनश्याम मापारी पुरुषोत्तम रंजवे पोलीस पाटील उमताई इंगोले उपसरपंच अर्चनाताई कालापाड तंटामुक्ती अध्यक्ष केलास पाटील माजी सरपंच दत्तराव  मापारी ग्रामपंचायत सदस्य मारोती इंगोले माधव शिंदे रवी जाधव सतिष इंगोले सिताराम इंगोले व गावातील महिलांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थिती होते कार्यक्रमाचे संचालन  शिवराज कुबडे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना कालापाड यांनी केले

महेंद्रकुमार महाजन 9960292121

No comments:

Post a Comment