तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

भारतीय वायुदलाला लाभणार लढाऊ विमानांचे बळ


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि.१६
भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 324 तेजस लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. वायुदलाच्या ताफ्यात आत्तापर्यंत 123 तेजस लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. या लढाऊ विमानांची किंमत 75 हजार कोटी रुपये आहे अशी माहितीही समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू दलाने 201 तेजस-मार्क टू विमानांचा ताफ्यात समावेश करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
नव्याने सहभागी होणाऱ्या तेजस विमानांची रडार क्षमता, इंजिन क्षमता आणि शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता मागील विमानांपेक्षा जास्त चांगल्या दर्जाची आहे. सध्याच्या घडीला तेजस विमान 350 ते 400 किलोमीटरच्या परिसरात एक तासापर्यंत सक्रिय राहू शकते आणि 3 टन हत्यारे वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे.
 तसेच या विमानाच्या तुलनेत इतर सिंगल इंजिन विमानांचा विचार केला तर स्वीडनचे ग्रिपन-ई आणि अमेरिकेचे एफ-16 हे जास्त क्षमतेने काम करत आहेत.
 सध्याच्या तेजस विमानाच्या दुप्पट परिसरात ही लढाऊ विमाने जाऊ शकतात. तसेच या विमानांची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता तेजस विमानापेक्षा जास्त आहे.

No comments:

Post a Comment