तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

डॉ. दिनेश भालेराव यांचे अपघाती निधन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- हिंगोली येथील छत्रपती शाहू महाराज नगरातील रहिवाशी असलेले डॉ. दिनेश भालेराव यांचे आज सकाळी ७ च्या सुमारास पुसद-दारव्हा दिग्रस रस्त्यावर अपघाती निधन झाल्याची घटना घडली. येथील आदर्श महाविद्यालय, सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून काम केले. आज ते खाजगी कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा दिग्रसकडे एका शैक्षणिक संस्थेत जात असताना समोरून डुक्कर आल्याने, त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत सुमारे एक तास जागीच पडून होते. कुणीही वेळेत मदत केली नसल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. एका माजी सैनिकाने हिंमत करून त्यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा  परिवार आहे. अत्यंत मनमिळावू, नेहमी हसतमुख असलेल्या डॉ. भालेराव यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment