तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

आ.अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे शनिभक्तांना दिलासा


- - - - - - - - - - - - - -  - -
गोदावरी नदीपात्रात पोहचले पाणी
= = = = = = = = = = = =
गेवराई दि.१५(प्रतिनिधी) श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे देशातील सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे, दि.१७ रोजी शनिअमावस्या असल्याने येथे मोठ्या यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते, राज्यातूनच नव्हे तर देशभरातून शनिभक्त मोठ्या संख्येने राक्षसभुवन येथे या निमित्ताने येत असतात. मात्र गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनि देवस्थान ट्रस्ट, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आ. अमरसिंह पंडित यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे राक्षसभुवन नजीक गोदावरी नदीपात्रात कालव्यातून पाणी सोडण्यात आले. आ. अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे शानिभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे शनिवार दि.१७ मार्च रोजी शनिअमावस्येच्या निमित्ताने मोठ्या यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. सध्या गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्याने राक्षसभुवन येथील दशक्रिया विधी साठी येणाऱ्या लोकांना अक्षरशः पाणी विकत घेण्यात वेळ आली आहे. यात्रा उत्सवांत येणाऱ्या यात्रेकरूंना याचा मोठा फटका बसणार होता. नदीपात्रात पाणी नसल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि सिंचनाचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गेवराई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोडले जाणारे पाणी पूर्वी राक्षसभुवन भागापर्यंत अडविले जायचे मात्र नगरपरिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे सुमारे चार वर्षानंतर पहिल्यांदाच आ.अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून पैठण उजव्या कालव्याच्या गुळज वितरिकेतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे राक्षसभुवन ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

      श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सुहास चौथाईवाले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, माजी सरपंच प्रदीप काळम पाटील व ग्रामस्थांनी शनि भक्ताच्या सोयीसाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.अमरसिंह पंडित यांच्याकडे केली होती, आ.अमरसिंह पंडित यांनी जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासानाकडे पाठपुरावा करून जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची परवानगी मिळविली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे चार वर्षानंतर पहिल्यांद्याच गुळज येथील वितरिकेतून नदीपत्रात पाणी सोडण्यात आले. राक्षसभुवनकरांनी यामुळे मोठा आनंद व्यक्त केला. तात्यासाहेब नाटकर, काकासाहेब नाटकर, प्रदिप काळम, विलास पोटफोडे राहुल कोंढरे, पप्पू पोटफोडे, एकनाथ पोटफोडे, दामू पोटफोडे आदींनी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment