तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अधिक सुविधा निर्माण करणार


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत 
मुंबई : दि १५ विविध खाजगी रूग्णालयात असलेल्या धर्मदाय खाटांसाठी खाजगी रूग्णालयांना शासकीय पोर्टल पुढील 2 महिने वापरू देण्याची परवानगी या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली. या निर्णयामुळे लाखो रूग्णांना लाभ प्राप्त होणार असून, या संपूर्ण प्रक्रियेत गरिब आणि गरजू रूग्णांना लाभ मिळतो आहे की नाही, यावर वैद्यकीय अधिकारी देखरेख ठेवतील.
विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिरांतील गरजू रूग्णांना पुढील शस्त्रक्रिया उपचारांना मदत व्हावी, म्हणून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अधिक सुविधा निर्माण करण्यासाठी एक बैठक आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री श्री गिरिश महाजन, डॉ. दीपक सावंत, श्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment