तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 3 March 2018

परळी वैद्यनाथ तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळे सत्ताधारी व विरोधक राजकीय नेते पाठबळ करून दाबण्याचा प्रयत्न-वसंत मुंडे


पुणे कृषी आयुक्त कार्यालय समोर येथे दि.05 मार्च पासून आमरण उपोषण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघातील कृषी खात्याने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील तीन वर्षा करीता 34 86 कोटी रूपये फंड आलेला होता. त्यामध्ये अधिकारी व राजकीय नेते  गुत्तेदार यांच्या संगनमताने 18 कोटीचा भ्रष्टाचार आरोप वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाने कडे केलेला आहे. कृषी आयुक्त मा.सुनील केंद्रेकर यांनी नेमलेल्या दक्षता पथक पुणे यांनी 883 कामापैकी 307 कामे तपासणी त्यामध्ये 304 कामा अनियमता आढळली 576 कामे तपासणी नाहीत. त्यामध्ये 24 अधिकार्यांवर निलंबनाची कार्यवाही झाली आसुन 50% व 50% रक्कम अधिकारी व गुत्तेदाराकडुन वसुली करण्याचे आदेश कृषी आयुक्त पुणे दि.09 /12/2017 विभागीय कृषी आयुक्त औरंगाबाद जा.क्र.विकृसस/आस्था/अ-2/हजारे/7003/2017 दि.15 /12/2017
यांचा आदेश क्रमांक यांनी दिले आहे. निलंबित कर्मचारी व गुत्तेदारावर एफ.आय.आर. फौजदारी दाखल करण्याचे शासनाने आदेश गेल्या तीन महिन्यापुर्वी दिले आहेत. अद्याप कार्यवाही केली जात नसल्यामुळे दि.14 फेब्रुवारी 2018 ला तक्रार महाराष्ट्र शासनाकडे वसंत मुंडे यांनी दाखल केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे हे दि.05 मार्च रोजी पासून कृषी आयुक्त पुणे येथे आमरण उपोषण बसणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे.
    सविस्तर वृत्त असे की, जलयुक्त शिवार अभियान योजने अंतर्गत सत्ताधारी व विरोधक मोठ्या प्रमाणावर संगनमताने राजकीय डावपेच आखुन भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठबळ देत आहेत. शासनाने गुत्तेदार व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ वसुली संदर्भात आदेश असतांना अंमलबजावणी होत नसल्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वसंत मुंडे यांनी दि.05 मार्च 2018 ला अमारण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून तात्काळ कार्यवाही करण्याचे शासनाने आदेश मा.आयुक्त कृषी पुणे यांना दिले आहेत. परंतु गैरव्यवहार मदत करणारे रमेश भताने जिल्हा कृषी अधिकारी बीड सद्या पदोन्नतीवर लातूर विभागीय सहसंचालक कृषी या पदावर कार्यरत असलेले यांच्यावर निलंबनाची व संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या कडून वसुलीची व गुन्हे दाखल करण्या संदर्भात कार्यवाही झाल्याशिवाय अमारण उपोषण मागे घेणार नाही अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती यांनी दिली आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment