तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

बनवस येथे समाधान शिबिर

अरुणा शर्मा

  पालम :- तालुक्यातील बनवस येथे समाधान शिबिर नुकतेच पार पडले .या कार्यक्राचे अध्यक्ष बनवस संरपच सौ.बबिताई अप्पासाहेब कदम, प्रमुख पाहुणे जि.प.सदस्या. सौ.प्रणिता राठोड, तसेच पालम चे तहसिलदार सौ.तेजस्वीनी जाधव मॅडम, ना.तहसिलदार कदम, आरोग्य विभागाचे डाॅ. निरस, व डाॅ. रोकडे, विस्तार अधिकारी श्री बर्डेसर, तालुका कृषी अधिकारी श्री अंबुलगेकर उपसंरपच श्री मेघाजी सुरनर, ग्रा.पं.सदस्य बहिरवाड के.पी.,राजले मारोती, व तसेच श्री.शाहु कदम, श्री बस्वराज लांडगे, श्री पुणे ग्यानबा, श्री बालाजी दंते, श्रींमगले शिवाजी, श्री दंते गोंविद, सुरनर ध्रुपत, मोरे दलित, लांडगे चंद्रशेखर, लांडगे पुषोत्तम, मंत्रे राम, सुरनर लक्ष्मण, पुणे शिवाजी, लांडगे मन्मथ, तहसिलदार मॅडमनी सर्व नागरिकांना विविध योजनाचे मार्गदर्शन केले. आरोग्य विभागा तर्फे रुग्णाची तपासणी करून ओषध गोळ्याचे वाटप करण्यात आले. गावातील नागरिक व कार्यकर्ते यांना योजनाची माहिती देण्यात आली. खालील रहिवासी प्रमाणपत्र, उत्पनाचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, जाॅब कार्ड आदि. प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ग्रा.पं लिपिक श्री.कदम बालासाहेब, व लांडगे महेंद्र यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment