तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

निवडणुकीला विसरायचं असं करु नका राग कायम ठेवा राज ठाकरे


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि १२ किसान सभेतर्फे आपल्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबई असा लाखो शेतकऱ्यांच्या लाँग मार्च काढलाय. लाखोंचा सहभाग असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून गेल्या मंगळवारी निघाला. तो मुंबईत दाखल झाला असून रात्री २वाजता ते सोमय्या मैदान ते विधानसभा असा प्रवास करणार आहेत १०वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित ढवळे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक टू मुंबई असा भव्य मोर्चा काढलाय. या मोर्चाला शिवसेने, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची राज ठाकरेंनी भेट घेतली. मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे सोमय्या मैदानात दाखल झाले. सरकार एकदा माझ्या हातात द्या, मी तुमच्या मागण्या कशा पूर्ण करतो ते बघा, असं आश्वासन राज ठाकरेंनी या शेतकऱ्यांना दिलं. तसंच हे सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
मोर्चावेळी राग व्यक्त करायचा आणि निवडणुकीला विसरायचं असं करु नका. राग कायम ठेवा. तुमच्यासाठी जे जे शक्य आहे ते मी आणि माझा पक्ष करेल, असं आश्वासन राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.तुमच्या पायामधून आलेलं रक्त विसरु नका, असं राज ठाकरेंनी जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं.

No comments:

Post a Comment