तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

माळशिरस तालुका स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न !


--------------------------
पिलीव/सुजित सातपुते
   सोशल डेव्हलपमेंट सोसायटी वतीने माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीस प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख विस्तार अधिकारी नकाते सर,कार्यक्रमाच्या अध्यक्षा वकील आसावरी घाटे व डॉ.पंचशीला लोंढे यांचे हस्ते करण्यात आले.
   प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी केले तर शिक्षणाधिकारी देशमुख सर म्हणाले "शाळा दुसऱ्या वर्षी मॅरेथॉन सारख्या तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित करते आहे आणि लोकसहभाग आहे हे महत्वाचे असून आंतरराष्ट्रीय नृत्य कलाकारांना बोलावून वेगळा आदर्श निर्माण करते हे खरंच कौतुकास्पद आहे.तर डॉ.पंचशीला यांनी प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असून ती अबला नसून सबला आहे असे नमूद केले.अध्यक्षीय भाषणात वकील आसावरी घाटे यांनी शाळा भविष्यामध्ये निश्चित वेगळी उंची प्राप्त करून नवोदय ,स्पर्धा परीक्षा, खेळ अशा क्षेत्रात नावलौकिक करेल असा आशावाद व्यक्त केला.
   म्यारेथॉन मध्ये मोठया गटात सदाशिवराव देठे प्रशाला चांदापुरी चे सुभाष गेंड (प्रथम),झेंडे रोहित(तृतीय),मुलींमध्ये उतेजनार्थ साबळे अर्चना,पठाण फिजा, मोनिका पवार तर इंदापूर प्रशालेचा चोरमले
ओंकार(द्वितीय) लहान गटामध्ये सदाशिवराव देठे प्रशाला सुरज जाडकर (द्वितीय) जि.प शाळा महानवर ओंकार(प्रथम),तरंगे धनंजय (तृतीय) इ.विदयार्थ्यांना रोख बक्षिसे,मेडल आणि सहभागी प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी कर्मवीर शाळा पिलीव,जि.प शाळा अशा एकूण सत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमास जगातील तेरा देशात नृत्य सादर केलेले सच्चदानंद, शाळा समिती जितेंद्र देठे,भागवत मगर,बाळासाहेब जाडकर रिपाई दिलीप सरतापे आण्णा भोसले त्तरंगफलचे उपसरपंच शशी साळवे,अशोक पाटील, नाना जाधव ,मामा मगर,माणिक मगर इ मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मगर यांनी केले तर आभार अर्चना मगर यांनी मानले

No comments:

Post a Comment