तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 4 March 2018

जुनेद खान दुर्रांनी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी
पाथरी/नांदेड येथील कै शंकरराव चव्हाण सभागृहात रविवार ४ मार्च रोजी संत कबीर समता परिषदे तर्फे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल पाथरी नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा न प चे गट नेते जुनेद खान दुर्रांनी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून खा ब्रिगेडीयर सुधिर सावंत हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून काँग्रेस चे नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, प्रसिद्ध दिग्दर्शक,साहित्यीक डॉ जब्बार पटेल, विधिज्ञ अॅड राम हरपाळे यांची उपस्थिती होती. जुनेदखान दुर्रांनी यांनी पिताश्री आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या समर्थ मार्गदर्शनात कार्यक्षम राहात मागील काही वर्षात पाथरी शहराला नविन ओळख मिळऊन दिली.सामाजिक कार्य करत असतांनाच राजकीय क्षेत्रात प्रवेश करत नगरसेवक, नगराध्यक्ष ,न प गट नेता ही पदे भुषवत पाथरी शहराच्या सर्वांगीन विकासा साठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नां साठी सहका-यांच्या मदतीने  कायम प्रयत्न केले . याची प्रचिती 'मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ठ नगरपरिषद' हा पुरस्कार मिळवला या सोबतच शासनाचे विविध पुरस्कार मिळवले त्याच बरोबर शहरासह तालुक्यातील उदस़योन्मूख खेळाडूंना व्यासपीठ मिळउन देत पाथरी प्रिमियर लीग सुरू केली. या बाबींची दखल घेत संत कबीर समता परिषदेच्या वतिने रविवारी नांदेड येथिल कै शंकरराव चव्हाण सभीगृहात जुनेद खान दुर्रांनी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत नगरसेवक अलोक चौधरी, गोविंद हारकळ, साजिद राज, नितेश भोरे, शहजाद लाला आदी उपस्थित होते. या पुरस्कारा बद्दल आ  बाबाजानी दुर्रांनी,आ विजयराव भांबळे,आ मधूसूदन केंद्रे,राजेश विटेकर,भावनाताई नखाते,अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाषराव कोल्हे, चक्रधरराव उगले, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड. राजेश ढगे, रमेश तांगडे,सदाशिव थोरात ,सतिष वाकडे,कार्तिक घुंबरे,शेख खालेद,जगदीश कोल्हे, आदी राकाँचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment