तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

अस्मिता जागृती अभियानाच्या तिसऱ्या दिवशी बीड

आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पथनाट्य आणि लघुफिल्म द्वारे अस्मिता योजनेचा प्रचार करण्यात आला
प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि १५अस्मिता जागृती अभियानाच्या तिसऱ्या दिवशी बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पथनाट्य आणि लघुफिल्म द्वारे अस्मिता योजनेचा प्रचार करण्यात आला. सर्व शाळांमध्ये आणि गावांमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात प्रतिसाद मिळत आहे. आत्ता ह्या गावाकडच्या स्त्रियांना आणि मुलींना मानाने, सन्मानाने वावरता येईल , जगता येईल ह्याचे फार समाधान आहे. संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि प्रत्येक गावातील मुलींपर्यंत, स्त्रीपर्यंत हि योजना घेऊन जाणार आहोत.
असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी केले .

आपण सर्वानी पुढाकार घेऊन अस्मिता फंड मध्ये योगदान करून जास्तीजास्त मुलींना स्पॉन्सर करावे - https://mahaasmita.mahaonline.gov.in/

No comments:

Post a Comment