तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

परळी जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीची स्थापना

निमंत्रकपदी दत्ताप्पा इटके, अध्यक्षपदी राजेश देशमुख, कार्याध्यक्षपदी बाजीराव धर्माधिकारी यांची निवड

परळी जिल्हा निर्मितीचा लढा व्यापक करणार - राजेश देशमुख

--------------

परळी वैजनाथ, ता.12 (प्रतिनिधी) ः-

परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी गती देण्यासाठी व परळी जिल्हयाचा प्रश्न जनआंदोलनाने सोडविण्यासाठी सोमवारी (ता.12) येथे विविध पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या व्यापक बैठकीत परळी जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून समितीच्या निमंत्रकपदी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके यांची तर अध्यक्षपदी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख तर कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

येथील परळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन काळे यांच्या निवासस्थानी व त्यांच्याच अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात येवून कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यवाह म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते धम्मानंद मुंडे यांची तर समन्वयकपदी शिवसेनेचे तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांची तर मार्गदर्शकपदी ज्येष्ठ पत्रकार जी.एस.सौंदळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीवर सरचिटणीसपदी विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबामाउली फड, डॉ.मधुसूदन काळे, उपाध्यक्षपदी जुगलकिशोर लोहिया, उत्तमराव देशमुख, विकासराव डुबे, डॉ.राजाराम मुंडे, डॉ.शालीनी कराड, डॉ.सुर्यकांत मुंडे, राजभाऊ दहिवाळ, आयुबभाई पठाण, एन.के.सरवदे, वैजनाथ जगतकर, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, वहाजोद्दीन मुल्ला, सतीश जगताप, सय्यद बहाद्दूर, दिलीप जोशी, फेरोजखाँ पठाण, श्रीकांत पाथरकर, प्रा.अतुल दुबे, व्यंकटेश शिंदे, विलास ताटे, चेतन सौंदळे, अनंत इंगळे, कोषाध्यक्षपदी विजय वाकेकर, जयपाल लाहोटी, चिटणीसपदी डॉ.अजय मुंडे, दत्ता दहिवाळ, अनिल तांदळे, सुरेश टाक, प्रकाश जोशी, अ‍ॅड.अरूण पाठक, श्रीकृष्णा (भावड्या) कराड,  प्रा.बशीर सिद्दीकी, विजय भोयटे, शंकर आडेपवार, रवी मुळे, सहसचिवपदी मिर्झा फरकुंदअली बेग, एतेशाम खतीब, सुनील मस्के, प्रसिद्धी प्रमुख म्हणून शहर व तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. 

या बैठकीला परळी शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बैठकीनंतर नुतन पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना समितीचे नुतन अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले की, परळी जिल्हयाच्या मागणीसाठी व्यापक जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. या लढ्यास परळीकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment