तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

तोष्णीवाल महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.27 फेब्रुवारी रोजी मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.एस.एम वडगुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.एस.पी.खुपसे,प्रा.ए.जी.अंभोरे,प्रा.एच.टी.शिंदे,प्रा.डाँ.अंजली टापरे यांची उपस्थिती होती.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय फड यांनी केले या प्रसंगी शरद नरवाडे आणि रामेश्वर कांबले यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहीत्यावर तयार केलेल्या भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहीत्यावर आढावा घेऊन मराठी भाषेचे महत्व व मराठी भाषा जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रा.टी.यु.केंद्रे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डाँ.शंकर पजई,डाँ.विजय वाघ,डाँ.विकास शिंदे,अमोल लोया,डिगांबर भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment