तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

झेंडा कोणत्या पक्षाचा हे महत्वाचे नाही; दांडा मात्र शेतकऱ्याचा हवा - पुजा मोरे

सुभाष मुळे...
-----------------------
गेवराई, दि. 5 __ तरुणांनो हातात कोणत्याही राजकीय पक्षांचा झेंडा घ्या पण त्याला दांडा मात्र शेतकऱ्यांचा ठेवा असे सांगून लाचारी सोडा आणि स्वाभिमानाने जगायला शिका असे आवाहन पंचायत समितीच्या सदस्या पुजा मोरे यांनी केले आहे.
      गेवराईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ५ मार्च रोजी दुपारी तहसिल कार्यालयासमोर शासनाने काढलेल्या जी.आर. ची होळी करून बोंब मारो आंदोलन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम, सोमनाथ बोराडे, रवींद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, अशोक भोसले, तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, शेषेराव सदाफुले, नारायण हिंगे, रवींद्र पाटोळे, अशोक भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वाभिमानाचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम म्हणाले की, लढल्याशिवाय सरकार काही देणार नाही. त्यामुळे कोणीतरी येईल आणि आमच्यासाठी भांडले मग आपल्याला आयते मिळेल या अपेक्षेत राहू नका. खा राजू शेट्टी शेतकरी यांसाठी रस्त्यावर उतरताहेत पण त्यात आपण सहभागी झालेच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. पं स सदस्य पुजा मोरे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी अगोदर शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यानंतर शिवसेनेची पं स सदस्य आहे. शेतकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी स्वाभिमानीत सहभागी झाले आहे. तरुणांनो झेंडे कोणत्याही पक्षाचे घ्या पण त्याचा दांडा मात्र शेतकऱ्याचा ठेवा. राज्यभर शेतकऱी यांसाठी संघर्ष करण्याची तयारी आहे. शेतकरी व त्यांची मुले मुली आज आत्महत्या करीत आहेत. त्याची दखल कोणी घेत नाही. लाचारी सोडा आणि स्वाभिमानाने जगायला शिका असे आवाहनही त्यांनी केले.
      यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाभाऊ देशमुख म्हणाले की, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार आज प्रत्येक व्यवहारातून टॅक्स कापून करोडो रुपयांची तिजोरी भरीत आहे मात्र शेत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याला अनुदान द्यायला सरकार पैसा नाही म्हणतेय. आपल्या देशात इंग्रज आणि निजामाने सत्ता भोगून जेवढा अन्याय येथील लोकांवर केला त्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांवर केला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार सर्वात वाईट ठरले असे दरम्यान किरण तहकीक यांनी नदीकाठच्या गवताला नदीनेच लावला लळा, आणि या भ्रष्टाचारी सरकारने शेतकऱ्याचा कापलाय गळा असे म्हणत राज्य सरकारवर सडकून हल्ला केला. शेवटी शासनाने शेतकरी विरोधी काढलेल्या जी आर ची होळी करून शेतकऱ्यांनी बोंब ठोकली. या आंदोलनास योगेश्वरी डाके, जोत्सना खोड, पल्लवी सुखदेव, प्रमिला डाके, पंचशील जाधव आदींसह गेवराई तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment