तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 15 March 2018

कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला; तिघांवर गुन्हा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): आठ गोवंशीय जनावरे टेम्पोमध्ये दाटीवाटीने कोंबून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असताना परळीतील हनुमान चौकाजवळ काही तरुणांनी अडविली आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला तर जीपचालकाने गाडी अडविणाऱ्या तरुणांवर देखील मारहाणीचा गुन्हा नोंदविला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास परळी येथील हनुमान चौकाजवळ गोवंशीय जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेला टेम्पो (एमएच १३ सीयु ०८८५) परळीतील काही तरुणांनी मिळून अडविला. या टेम्पोत ८ गोऱ्हे दाटीवाटीने कोंबलेले होते. यावरून टेम्पोचालक इरशाद दस्तगीर शेख (रा. पापनास, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अतुल दुबे यांच्यात वाद सुरु झाला. याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक इरशाद याच्याकडे अधिक चौकशी केली असता टेम्पो अकबर युसुफ कुरेशी याच्या मालकीचा असून त्याने सदरील जनावरे बार्शीच्या बाजारातून गाडीत भरून दिली आणि परळी गौसभाई याच्याकडे देण्यास सांगितल्याची माहिती त्याने दिली. यावेळी इरशादजवळ वाहन चालक परवाना व आधार कार्ड, गाडीचे कागदपत्रे तसेच जनावरांचे पशुवैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र यापैकी एकही कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून जनावरे आणि टेम्पो असा एकत्रित ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि चालक इरशाद, टेम्पो मालक अकबर युसुफ कुरेशी आणि गौसभाई असा तिघांवर कलम १५८, २३, ३ (१), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(डी), पशु संरक्षण अधिनियम कलम ५ अन्वये परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, याच प्रकरणात टेम्पो चालक इर्शाद यानां दोघे जणांनी   मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद दिली आहे. इर्शादच्या फिर्यादीवरून दोघे जणावर यांच्यावर कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment