तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

राडी तांडा ग्रामपंचायत ना. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात

नवनिर्वाचीत सरपंच प्रयाग बाई आडे यांचे स्पष्टीकरण

भाजप ने दावा करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे - रणजीत लोमटे
अबाजोगाई ( प्रतिनिधी ) - तालुक्यातील काल जाहीर झालेल्या निकालात प्रतिष्ठेची राडी ग्रा. प. ना.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राडी तांडा आपल्या ताब्यात असा भाजप व काँग्रेसने दावा केला होता मात्र राडी तांडा ही ग्रामपंचायत ही विरोधी पक्षनेते ना. मुंडेच्याच नेतृत्वात जिंकल्याचे नवनिर्वाचित सरपंच प्रयाग बाई आडे यांनी स्पष्ट केले आहे तर भाजप ने खोटे दावे करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे असे मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे यांनी व्यक्त केले.
परळीपरळी मतदार संघातील विविध निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा विजयरथ रोखता आलेला नसल्याने आगामी परळी विधानसभा निवडणुक रंगतदार ठरणार आहे.
   परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालूक्यातील मोठी राडी ग्रामपंचायत ही भाजपाच्या हातुन हिसकावून राष्ट्रवादी पक्षाने आपल्या हाती घेऊन एक हती सत्ता  स्थापन केली ,या निवडणुकी कडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व जिल्हाच्या पालकमंत्री पंकजा ताई मुंडे या दोघांचे विशेष लक्ष होते . मात्र येथील अपयश झाकण्यासाठी राडी -तांडा ग्रामपंचायतीवर भाजप व काँग्रेसने दावा केला होता मात्र नवनिर्वाचीत सरपंचानीच ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचे सांगीतल्याचे सांगीतल्याने भाजप व काँग्रेसच पितळ उघड पडल असे बोलले जात आहे.
राडीतांडा गावच्या सरपंच प्रयाग बाई आडे, काशीनाथ आडे, सागरबाई आडे, गोपीचंद राठोड, सपना चव्हाण , गिरजाबाई आडे, रामचंद्र आडे, किसाबाई राठोड या निवडुन आल्या आहेत.
यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य यांची गावात जंगी मिरवणूक काढण्यात आली . यावेळाी  गुलाल उधळून पेढे वाटून गावातील महिलांनी त्यांना ओवाळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला ,विजयी उमेद्वाराचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी भ्रमणध्वनी द्वारे  अभिनंदन केले.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment